Posts

Showing posts from 2016

जीव गुंतला

Image
सांगू कसा मी तुला, जीव माझा गुंतला, तोडलेस जरी बंध तू, धागा धागा मी बांधला, उभा मी त्या तिरी, तू जिथे हात सोडला, वाट पाहतो मी तुझी, डोळ्यात प्राण साठला !!!

अबोला

Image
ना रुचे तुझा अबोला, सांग सखे काय गुन्हा झाला, दुरावा तुझा जाळीतो जीवाला, आठवून न आठवे अपराध मजला!!! तुझा रुसवा, तुझा फुगवा, वाटे हवासा तुझा राग लटका, प्रायश्चित करण्या केले किती प्रयास, तुझ्या अबोल्यावर विजय न झाला  !!! कसा दूर राहू, ना कळे मजला, आठवणीने जीव कासावीस झाला, माफी असावी झाल्या चुकीला, घे जवळी आता, प्राणप्रिये मजला!!!

मी पहावे

Image
मी पहावे, तू दिसावे, आणखी काही मागणे नसावे, तुझ्या डोळ्यात मी दिसावे, हेच स्वप्न डोळ्यात राहावे, ओठात तुझेच नाव राहावे, तुझ्या नावासोबत माझे नाव यावे, गेलीस कितीही दूर तरी, मी पहावे, तू दिसावे !!!

सावली

Image
चाहूल लागली मनाला, अंकुर जसा नवा उमलला, आवरू मी कशाला, तुझ्या प्रीतीचे वरदान मजला, सावली बनली सोबत आता, ना राहिले भय मजला !!! Image Source

सगळं कस आपोआप होत

सगळं कस आपोआप होत, तुला पाहण्या मन आतुर होतं, मनामध्ये काहूर माजत, साऱ्या दिशा अंधारून जातात, पाय आपोआप तुझ्याचकडे वळतात, सगळं कस आपोआप होत, तुला पहाता,  भोवतालचं जग विसरून जात, मनातलं काहूर शांत होतं, सगळीकडे थंड गार वार वहात,    सगळं कस आपोआप होत, तुझा हात हाती येता, शब्द माझे मुके होतात, मुक्यानेच बोलू लागतात, अंतर्मनाच्या पडद्यावर तुझा स्पर्श साठवून ठेवतात !!!

तुझ्या विना

तुझ्याविन माझे जग थांबलेले, तारीख बदलली पण दिन थांबलेले, जीवनक्रमाच्या चाकोरीत सर्व बांधलेले, तुझ्याविन माझे जग थांबलेले !!! ना दुःखाची चिंता, ना सुखाची आस तुझ्याविन जिने हे सारे उदास, आलेला दिवस पुढे लोटाने,  याहून आता काही नाही राहिलेले, तुझ्याविन माझे जग थांबलेले !!! साद नभांची, फुला पाखरांची, ना राहिली आस मला चिंब होण्याची, रात्रंदिवस तुझ्या भोवती गूंफिलेले, तुझ्याविन माझे जग थांबलेले !!!

कळी

Image
कळी माझ्यावर रुसली अशी, नाक मुरडून बसली कशी, नाकावरचा राग मी काढू कसा, कळीला माझ्या समझ घालू कसा, खुलली कळी तरच फांदीला सुखं, कलिविना फांदी म्हणजे काटेच खूप !!!

कदर

Image
ना हमने कि जमाने कि फिकर ना जमानेने कि हमारी फिकर, जिसको चाहा हमने टूटकर, ना उसको भी है हमारी कदर, यूँही चाहते रहेंगे उनको शामोसहर , जबतक चले ये जिंदगी का सफर!!!

स्वप्नं

तुझ्या स्वप्नांना मी रंगवावं, माझ्या स्वप्नांना तू रेखाटाव, कितीही दूर असलो तरी, एकमेकांना पुरून उराव !!! चांद रात सरली तरी, मी तुला न्ह्याहाळाव, सोबत असता आपुली, सारं अंतर सराव !!! मिटता डोळे नेहमी, समोर तूच दिसावं, माझ हे स्वप्न, एकदा पूर्ण व्हावं!!!

चूक

माफ करशील ना मला , माझ्या अक्षम्य चुकीला, नकळत अपराध हा घडला, क्षणासाठी हाथ तुझा सुटला, घडलं विपरीत त्या क्षणाला, ना विसर पडेल माझ्या मनाला, सोसाव लागेल सारं तुला, जाणीव आहे ...

मोबाईल वेटिंग

24 तास झाले , तुझा मेसेज येऊन, वेळ जात नाही, फक्त मोबाईल कडे बघून, लास्ट सीन बघून बघून, दिवस गेला निघून, गेलीस कुठे तू हरवून, कॉल देखील कट होतो रिंग टोन वाजून, तुझी वाट बघण्यात माझ...

जगाला विसरूदे

Image
लाली तुझ्या ओठाची,  माझ्या ओठावर चढूदे, दरवळत सुगंध तुझा, माझ्या तनभर पसरुदे, होउदे बेधुंद हे क्षण, स्वतःला विसरुदे, ये जवळ साजणी, या जगाला विसरूदे !!! Image Source   https://ravi654.wordpress.com/2016/05/19/love-is-life-life-is-love/

भेटी ची गोष्ट

Image
भेटी भेटी ची गोष्ट, कधी छोटी तर कधी मोठी, भेटी भेटी ची गोष्ट, कधी तिखट तर कधी गोड, भेटी भेटी ची गोष्ट, कधी रुसू तर कधी हसू, भेटी भेटी ची गोष्ट, कधी तुझी तर कधी माझी, भेटी भेटी ची गोष्ट, असो कशीही जरी,  नेहमी हविहवी तरी!!!

सोबत तुझी

Image
जगू कसा तुझ्या विना, हे कोडे मला सुटेना, हवी तुझी सोबत मला, आठवणीत जगणं आता जमेना !!! जगू कसा तुझ्या विना, ना कळले माझ्या मना, अंधारल्या साऱ्या दिशा, वाट तू दाखव ना !!! साथ दे तू पुन्हा, न्हावू घाल माझ्या मना, वाट पाहतो मी तूझी, एक झलक दाखव ना !!!

पण मी कुठेच नसेन

Image
शब्द असतील माझे, पण मी कुठेच नसेन, आठवणी असतील माझ्या, पण मी कुठेच नसेन, पावलो पावली भास होईल, पण मी कुठेच नसेन, हाक ओळखीची असेल, पण मी कुठेच नसेन, दिवस तोच असेल, पण मी कुठेच नसेन, हाक दे एखादी, जेंव्हा मी असेन !!!

तुझे आगमन

Image
वसंतातल्या वृक्षाप्रमाणे बहरले हे मन, तुझ्या भेटीच्या चाहुलीने, पुलकित झाले मन, तुझ्या आगमनाने, तुला पाहण्या आतुरले हे मन, तुला भेटण्या नवे बहाणे शोधू लागले हे मन, डोळे भरून तुला पाहण्या, आसुसले हे मन, तुझ्याच मिठीत विरून जाण्याची, वाट पाहते मन !!! Image Source :http://findwallpapershd.com/hug-day/couple-love-hugs-greatly-bleasing-hd-wallpaper/

तू

Image
वादळात ही सुगंध तू, रणरणत्या उन्हात थंडगारशी झुळूक तू, आमावसेने ग्रासलेल्या जीवनाला पौर्णिमेचा चंद्र तू,  उरले फक्त शरीर माझे, मनात तू अन श्वासात ही तू !!!

इंद्रधनु

Image
तुझ्या आठवणींची एक कहाणी, देवून गेली ओठावर हसू, डोळ्यात पाणी, आठवणींचा हा इंद्रधनु साथ देईल कुठवर, वाट पाहतो मी तुझी, इंद्रधनुच्या क्षितिजावर!!!

नेहमी असच होतं

Image
नेहमी असच होत, पहिल्या पावसाचा सुगंध, तुझी आठवण घेऊन येतो, तुझ्यासोबत चिंब भिजावं, अशी इच्छा जगावून जातो !!! नेहमी असच होत, छानस एखाद गाण ऐकल कि, ते तुझ्यासाठीच लिहिलंय वाटत, अन त्या गाण्यावर तुझ्यासोबत, धुंध धुंध व्हाव वाटत !!!

सोबत तूझी

Image
तूझी सोबत असेल तर, दिवस देखील लहान होतो, तू दूर निघून जाताच, क्षण देखील दिवसाएवढा होतो!! तुझ्या आठवणी गर्दी करतात, तुझेच विचार मनी दाटतात, कसा दूर राहू तुझ्यापासून, नाही कळत माझे मलाच, पुन्हा एकदा तुझ्या भेटीची, आस राही माझ्या मनात!!!

आठवणीचा सागर

Image
तुझी आठवण यायला, आधी तुला विसरव लागेल, तूला विसरायला, आधी मनाला आवराव लागेल, मनाला आवरायला, तूला भेटाव लागेल, तूला भेटल्यावर, पून्हा तुझ्यापासून दूर जाव लागेल… तुझ्या पासून दूर जाताच, आठवणीच्या सागरात पुन्हा डुंबाव लागेल !!!

आठवणींची कहाणी

Image
कशी तुला सांगू, तुझ्या आठवणींची कहाणी, शब्द पुसूल गेले सारे, कागदावर राहिले फक्त डोळ्यातले पाणी !!!

आठवणींच घरट

Image
माझ्या मनात तुझ्या आठवणींनी एक टुमदार घर बांधलय , माझ मन तिथेच नेहमीसाठी विसावलय !!!

तुझा DP

DP बघत बघत तुझा, दिवस निघून जातो, last seen मात्र चेंज होत नाही, पण Online जेंव्हा जेंव्हा येतेस, वेळ मात्र पुरत नाही !!!