अबोला


ना रुचे तुझा अबोला,
सांग सखे काय गुन्हा झाला,


दुरावा तुझा जाळीतो जीवाला,
आठवून न आठवे अपराध मजला!!!


तुझा रुसवा, तुझा फुगवा,
वाटे हवासा तुझा राग लटका,


प्रायश्चित करण्या केले किती प्रयास,
तुझ्या अबोल्यावर विजय न झाला  !!!


कसा दूर राहू, ना कळे मजला,
आठवणीने जीव कासावीस झाला,

माफी असावी झाल्या चुकीला,
घे जवळी आता, प्राणप्रिये मजला!!!

Popular posts from this blog

सोबत तूझी

कळी

तुझ्या विना