तुझ्याविन माझे जग थांबलेले, तारीख बदलली पण दिन थांबलेले, जीवनक्रमाच्या चाकोरीत सर्व बांधलेले, तुझ्याविन माझे जग थांबलेले !!! ना दुःखाची चिंता, ना सुखाची आस तुझ्याविन जिने हे सारे उदास, आलेला दिवस पुढे लोटाने, याहून आता काही नाही राहिलेले, तुझ्याविन माझे जग थांबलेले !!! साद नभांची, फुला पाखरांची, ना राहिली आस मला चिंब होण्याची, रात्रंदिवस तुझ्या भोवती गूंफिलेले, तुझ्याविन माझे जग थांबलेले !!!