Posts

मनातलं चांदणं

तुझ्या माझ्या मनातल, चांदण पसरल ग, मिलनाची रात आता,  आभाळही बरसल ग, हात तुझा घेता हाती, अंतरही सरलं ग, मिठीमध्ये माझ्या,  माझ जग सामावल ग, चुंबनाच्या वर्षावात,  रात आता सरुदे ग, साथ आपली ही आता, जन्मजन्मतारी राहूदे ग !!!

एक भेट छोटीशी

एक स्वप्न छोटस, जस गोड मिठीच, एक हाक ओळखीची, जशी ओढ अंतरीची, एक भेट नजरेची, जशी गाठ जन्माची, एक बोल मनाचा, जसा वर्षाव ग्रीष्माचा, एक स्पर्श छोटासा, जसा हवा हवासा, एक भेट छोटीशी, जशी कुपी अत्तराची, उधळती सुगंध, जशी रातराणी राती !!!

बोलत बसावं तुझ्याशी

Image
बोलत बसावं तुझ्याशी, असच दिवस अन रात्र, वारा वाहवा असाच, सोबत घेऊन बरसात, मी तुला पाहावे, तू हळूच लाजावे, लाजता लाजत हसावे, अन मिठीत विरून जावे, मिठी अशीच घट्ट राहावी, बदलो जरी दिन रात्र, बोलत बसावं तुझ्याशी, असच दिवस अन रात्र !!!

सांग प्रिये

Image
तूच सांग प्रिये, पाहू कोठे मी आता !!! स्वप्न एक माझे, तेही भंगले आता !!! अंधारल्या दिशा दाही, पाहू कोठे मी आता !!! प्रेमळ साथ एक होती, तीही दुरावली आता !!! जरी स्वप्न नवे आले,  पाहण्या न नेत्र राहिले !!! तूच सांग प्रिये, पाहू कोठे मी आता !!!

जीव गुंतला

Image
सांगू कसा मी तुला, जीव माझा गुंतला, तोडलेस जरी बंध तू, धागा धागा मी बांधला, उभा मी त्या तिरी, तू जिथे हात सोडला, वाट पाहतो मी तुझी, डोळ्यात प्राण साठला !!!

अबोला

Image
ना रुचे तुझा अबोला, सांग सखे काय गुन्हा झाला, दुरावा तुझा जाळीतो जीवाला, आठवून न आठवे अपराध मजला!!! तुझा रुसवा, तुझा फुगवा, वाटे हवासा तुझा राग लटका, प्रायश्चित करण्या केले किती प्रयास, तुझ्या अबोल्यावर विजय न झाला  !!! कसा दूर राहू, ना कळे मजला, आठवणीने जीव कासावीस झाला, माफी असावी झाल्या चुकीला, घे जवळी आता, प्राणप्रिये मजला!!!

मी पहावे

Image
मी पहावे, तू दिसावे, आणखी काही मागणे नसावे, तुझ्या डोळ्यात मी दिसावे, हेच स्वप्न डोळ्यात राहावे, ओठात तुझेच नाव राहावे, तुझ्या नावासोबत माझे नाव यावे, गेलीस कितीही दूर तरी, मी पहावे, तू दिसावे !!!