सगळं कस आपोआप होत
सगळं कस आपोआप होत, तुला पाहण्या मन आतुर होतं, मनामध्ये काहूर माजत, साऱ्या दिशा अंधारून जातात, पाय आपोआप तुझ्याचकडे वळतात, सगळं कस आपोआप होत, तुला पहाता, भोवतालचं जग विसरून जात, मनातलं काहूर शांत होतं, सगळीकडे थंड गार वार वहात, सगळं कस आपोआप होत, तुझा हात हाती येता, शब्द माझे मुके होतात, मुक्यानेच बोलू लागतात, अंतर्मनाच्या पडद्यावर तुझा स्पर्श साठवून ठेवतात !!!