Posts

Showing posts from May, 2017

मनातलं चांदणं

तुझ्या माझ्या मनातल, चांदण पसरल ग, मिलनाची रात आता,  आभाळही बरसल ग, हात तुझा घेता हाती, अंतरही सरलं ग, मिठीमध्ये माझ्या,  माझ जग सामावल ग, चुंबनाच्या वर्षावात,  रात आता सरुदे ग, साथ आपली ही आता, जन्मजन्मतारी राहूदे ग !!!

एक भेट छोटीशी

एक स्वप्न छोटस, जस गोड मिठीच, एक हाक ओळखीची, जशी ओढ अंतरीची, एक भेट नजरेची, जशी गाठ जन्माची, एक बोल मनाचा, जसा वर्षाव ग्रीष्माचा, एक स्पर्श छोटासा, जसा हवा हवासा, एक भेट छोटीशी, जशी कुपी अत्तराची, उधळती सुगंध, जशी रातराणी राती !!!