पण मी कुठेच नसेन


शब्द असतील माझे,
पण मी कुठेच नसेन,

आठवणी असतील माझ्या,
पण मी कुठेच नसेन,

पावलो पावली भास होईल,
पण मी कुठेच नसेन,

हाक ओळखीची असेल,
पण मी कुठेच नसेन,

दिवस तोच असेल,
पण मी कुठेच नसेन,

हाक दे एखादी,
जेंव्हा मी असेन !!!


Popular posts from this blog

सोबत तूझी

कळी

तुझ्या विना