मनातलं चांदणं
तुझ्या माझ्या मनातल,
चांदण पसरल ग,
मिलनाची रात आता,
आभाळही बरसल ग,
हात तुझा घेता हाती,
अंतरही सरलं ग,
मिठीमध्ये माझ्या,
माझ जग सामावल ग,
चुंबनाच्या वर्षावात,
रात आता सरुदे ग,
साथ आपली ही आता,
जन्मजन्मतारी राहूदे ग !!!