एक भेट छोटीशी


एक स्वप्न छोटस,
जस गोड मिठीच,

एक हाक ओळखीची,
जशी ओढ अंतरीची,

एक भेट नजरेची,
जशी गाठ जन्माची,

एक बोल मनाचा,
जसा वर्षाव ग्रीष्माचा,

एक स्पर्श छोटासा,
जसा हवा हवासा,

एक भेट छोटीशी,
जशी कुपी अत्तराची,

उधळती सुगंध,
जशी रातराणी राती !!!

Popular posts from this blog

सोबत तूझी

कळी

तुझ्या विना